मी आकाश , तू चांदणी
मी हृदय , तू रोहिणी
हे बंध रेशमाचे , अतूट होतील का?
मी पवन लहरी, तू सुगंध होशील का?
तू वेल बहरलेले , मी कुंपण
तू प्रेम विखुरलेले , मी बंधन
नाते हे जीवांचे , संबंध जीवनाचे होतील का?
मी दिवस , अन तू रात्र , चक्र जीवनाचे होशील का?
कधी मी गीत भावनेचे , तर तू सूर होऊन नाचे
कधी मी धुके होई वनांचे , तर तू सिंचन होई दवांचे
गीतात माझ्या सूर तुझे मिसळतील का?
जीवनकाव्यात तू संगीत हृद्याचे होशील का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा