सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

घर

  माझीच दारे जेव्हा मला अडवतात
तेव्हा मी निष्प्रभ होतो

दाराच्या सुबक नक्षीकडे
उगीच केविलवाणे पाहत बसतो

घडवतांना मढवतांना
किती श्रम घेतले होते
आजही त्याचा हिशोब
माझ्या खिशात बंद असतो
पण त्यांचाही काय दोष
ती बिचारी निर्जीव असतात
ती पण माझ्याकडे केविलवाणी होऊन पाहत बसतात
ते सुबक , रचलेले , कोरलेले
दरवाजे माझ्याने तोडवत नाहीत
आणि मी आतही जाऊ शकत नाही
माझ्याच घरात .........
कानोसा घेतल्यावर कळते
आता ते घर माझे नसते

1 टिप्पणी:

स्पर्श तुझा पहिला

झनझनली, शिरशिरली रुह्दयात मुरली कपोल हसले अधर खुलले मनात बसले चित्त तुझे ठसले स्पर्शासह खुलले नंदनवन मनात फुलले हास्याच्या लहरी मधुन...