गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

स्पर्श तुझा पहिला

झनझनली, शिरशिरली
रुह्दयात मुरली

कपोल हसले
अधर खुलले
मनात बसले

चित्त तुझे ठसले
स्पर्शासह खुलले
नंदनवन मनात फुलले

हास्याच्या लहरी मधुन
ऊकळे शब्द प्रेम भरूनी

स्पर्शाच्या पहील्या ओघात
होती कीती प्राण आघात

खदखदती शब्द आतुनी
फुलवी मन ते स्फुंदुनी
क्षणभर जगाला विसरूनी
ये मना अंतराळ फिरुनी

पहिल्या स्पर्शासह........

विडंबन

फुलली फुले - त्या योगे उपवन खुलले
दरवळला - सुगंध सुखवाया तो सकळा
स्वैरपणे - अलिगण उडणे -बागडणे
मधुनादे - गाती प्रभुगण आनन्दे  
रम्य आहा - दोन व्यक्ती आले पहा
विचराया - पुरूषही आला त्या ठाया
मंदगती - स्री तेथे हिन्डत होती
कौतुकली - हसली, बाग मनी ठसली
नव फुलले - पुष्प एक तिज आवडले
प्रेमभरे - खुडले तिने ते स्वकरे
हुंगियले - चुंबियले, माथा धरीले
क्षणमात्रे - होय नकोसे ते तिजले
कुस्करीले - फेकुन धरणीवर दिधले
सर्वक्रूती - पुरुष तो अवलोकीत होता
गहीवरला - क्षणमात्रे तो हळहळला
का तसे? - काय कथू मी रसिकांते.......











प्रेम बंधन

मी  आकाश , तू  चांदणी 
मी  हृदय , तू  रोहिणी 
                                   हे बंध रेशमाचे , अतूट होतील का?
                                   मी  पवन लहरी, तू सुगंध होशील का?
तू वेल बहरलेले , मी कुंपण 
तू प्रेम विखुरलेले , मी बंधन 
                                   नाते हे जीवांचे , संबंध जीवनाचे होतील का?
                                    मी दिवस , अन तू  रात्र , चक्र जीवनाचे होशील का?
कधी मी गीत भावनेचे , तर तू सूर होऊन  नाचे 
कधी मी धुके होई वनांचे , तर  तू सिंचन होई दवांचे 
                                    गीतात माझ्या सूर तुझे मिसळतील का?
                                     जीवनकाव्यात तू संगीत हृद्याचे होशील का?

इच्छा

रूप तुझे लोचनात
लावण्य तुझे चांदण्यात , लपवू दे

सूर तुझे गुंफण्यास
छंद तुझे ओवण्यास , गीत गाऊ दे

नृत्य वर्षेचे प्रांगणात
वलये सुरांचे गगनात , स्वैर होऊ दे

प्रीतीत स्वप्न रूप घेई
ऋतूंना वसंत बहर देई , कंठ कोकिळेला फुटू दे

पारिजातक गंध धुंद  अन मंद
वाऱ्याचे तांडव उन्मेद अभेद , प्रकृतीत नाचू दे

वर्षाधारा

वर्षाधारांनी हेच आंगण हिरवळले होते
तुडुंब भरून वाहणाऱ्या अंगणात
माझी होडी डोलत होती
पाहतांना कसे रम्य वाटायचे
जिकडे तिकडे हिरवळ
साचलेले तुडुंब पाणी
त्यात मनसोक्त पोहणारी होडी
फक्त माझीच होडी नव्हती तर
त्याबरोबर तुझीही होडी डोलायची
अगदी जवळ जवळ
आणि आपण पाणी वल्हवून त्यांना वेग द्यायचो
किती गंमत होती नाही !
कोणाची होडी पुढे जाते म्हणून कोण धडपड
पण मी सावकाश तुझ्याच होडीबरोबर
माझी होडी ढकलायचो
अगदी समांतर समांतर
हा खेळ कितीतरी वेळा खेळलो आपण
पण वर्षेच्या सिंचनात फक्त
वर्षाधारांनी मी न्हाऊन निघालो
कितीतरी वेळा अगदी मनसोक्तपणे
वर्षाधारांना बाहुपाशात घेऊन खूप मजा लुटली
'श्रावणमासी हर्षमानसी ' म्हणतात ना
अगदी तसा आनंद लुटला
आता मात्र माझी होडी
विस्कटून पडली आहे अस्ताव्यस्त खिन्न छीन्न होऊन
मन सुद्धा कोरडे पडले आहे
तहानेने व्याकुळ होऊन
डोळे वाट पाहत आहेत
त्या अमृत धारांची
पण आता काय उपयोग ?
तो बालिशपणा संपला आता
खूप उशीर झाला आहे
वर्षेच्या धारेत
वाहत्या पाण्यात
बरोबरीने होडी सोडायचे
वयही राहिले नाही आता
माझ्या समोर
ह्या डोळ्यादेखत
ज्यांच्यात ती सारी स्वप्ने लपलेली आहेत
त्या डोळ्यांदेखत
वर्षा चालली आहे
दुसऱ्याची झाली आहे
होडीचा खेळ खेळण्यासाठी
बाहुपाशात झेल झेलण्यासाठी   

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

खंत

होते जलाशयात पाणी , श्वापदेही दूर गेली 
होते खिशात नाणी , नातेही दूर गेली 

होती कह्यात माझ्या , हि विशाल राजवंशी 
आता झालो भिकारी , ती तुतारीही दूर झाली 

ज्यांच्यात एव्हढ्याचा , एव्हढा थोरला झालो 
संपताच ' माया ' माझी , माय-बापही मला विसरून गेली 

काय आठवावी कालची , ती स्वप्नील स्वप्ने 
वाळवंटात माझ्या तीही, मुगजळात वाहून गेली 

खऱ्याचे कधी नव्हते , खऱ्याचे कधीही नाही 
केली पूजा जी देवाची , आता ती पुरे झाली 

घर

  माझीच दारे जेव्हा मला अडवतात
तेव्हा मी निष्प्रभ होतो

दाराच्या सुबक नक्षीकडे
उगीच केविलवाणे पाहत बसतो

घडवतांना मढवतांना
किती श्रम घेतले होते
आजही त्याचा हिशोब
माझ्या खिशात बंद असतो
पण त्यांचाही काय दोष
ती बिचारी निर्जीव असतात
ती पण माझ्याकडे केविलवाणी होऊन पाहत बसतात
ते सुबक , रचलेले , कोरलेले
दरवाजे माझ्याने तोडवत नाहीत
आणि मी आतही जाऊ शकत नाही
माझ्याच घरात .........
कानोसा घेतल्यावर कळते
आता ते घर माझे नसते

स्पर्श तुझा पहिला

झनझनली, शिरशिरली रुह्दयात मुरली कपोल हसले अधर खुलले मनात बसले चित्त तुझे ठसले स्पर्शासह खुलले नंदनवन मनात फुलले हास्याच्या लहरी मधुन...